UPI ATM Cash Withdrawal: डेबिट कार्डशिवाय ATM मधून पैसे काढण्याची प्रक्रिया

Atm मधून रोख रक्कम काढण्यासाठी सामान्यतः आपण डेबिट कार्डचा वापर करतो. आपल्या बँक खात्यातील रकमेवर आधारित असलेल्या या कार्डचा उपयोग करून आपण सहजपणे पैसे काढू शकत
ATM मधून रोख रक्कम काढण्यासाठी सामान्यतः आपण डेबिट कार्डचा वापर करतो. आपल्या बँक खात्यातील रकमेवर आधारित असलेल्या या कार्डचा उपयोग करून आपण सहजपणे पैसे काढू शकतो. पण अनेक वेळा आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड घरात राहून जात असल्यामुळे किंवा आपल्याला तातडीने पैसे आवश्यक असताना, आपण एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी अडचणीत येतो. यामुळे, आपल्याला परत घरात जाऊन कार्ड आणावे लागते किंवा इतर कोणाकडून पैसे उधार घ्यावे लागते. पण आता युपीआयच्या माध्यमातून, आपल्याला एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी कार्डची आवश्यकता नाही. युपीआय अॅप्स जसे की गुगल पे, फोन पे किंवा भीम वापरून आपण एटीएममधून रोख रक्कम काढू शकतो. या सुविधेची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली, तरीही अनेक लोकांना याबद्दल माहिती नाही.
युपीआय-एटीएम ही एक नवीन सुविधा आहे जी कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची परवानगी देते. याला इंटर पोर्टेबल कार्डलेस युपीआय (ICCW) असे नाव देण्यात आले आहे. ही सुविधा एनपीसीआय आणि हिताची पेमेंट सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. युपीआयच्या माध्यमातून एटीएममध्ये पैसे काढताना, आपण ज्या प्रकारे बाजारात भाजी खरेदी करताना किंवा सिनेमाचे तिकीट काढताना क्यूआर कोड स्कॅन करतो, तसाच प्रकार येथेही लागू होतो. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करणे आवश्यक आहे.





















