New Series Takes OTT by Storm: 'ऑपरेशन सफेद सागर' बनली नंबर १

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. नुकतीच एक नवी ६ भागांची सीरिज 'ऑपरेशन सफेद सागर' प्रदर्शित झाली आहे,
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. नुकतीच एक नवी ६ भागांची सीरिज 'ऑपरेशन सफेद सागर' प्रदर्शित झाली आहे, जी रिलीज होताच भारतात नंबर १ वर ट्रेंड करत आहे. या सीरिजने ओटीटीच्या जगात धुमाकूळ घातला आहे. 'ऑपरेशन सफेद सागर' ही सीरिज १९९९ च्या कारगिल युद्धावर आधारित आहे, ज्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या शौर्याची कहाणी सांगितली आहे. या ६ भागांच्या सीरिजमध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्य, त्यांच्या कठीण परिस्थितीत केलेल्या मोहिमा आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांचा पराक्रम प्रभावीपणे दर्शविला गेला आहे.
या सीरिजमध्ये दिग्गज कलाकारांची तगडी स्टारकास्ट आहे, ज्यामध्ये जिमी शेरगिल, सिद्धार्थ, अभय वर्मा, दिया मिर्झा आणि महेश मांजरेकर यांचा समावेश आहे. या सर्व कलाकारांनी त्यांच्या भूमिकांमध्ये उत्कृष्टता दाखवली आहे आणि प्रेक्षकांकडून त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले जात आहे. 'ऑपरेशन सफेद सागर' ७ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाली आणि रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच प्रेक्षकांनी या सीरिजला डोक्यावर घेतले आहे. सध्या ही सीरिज नेटफ्लिक्सवर आवर्जून पाहावी अशी (Must Watch) बनली आहे.





















