Highway Development: जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे संरेखन निश्चित

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार जळगावपर्यंत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्ण
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार जळगावपर्यंत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर यांना जोडणारा खानदेश द्रुतगती महामार्ग लवकरच बांधण्यात येणार आहे. या महामार्गाचे संरेखन एमएसआरडीसीने निश्चित केले असून, या प्रस्तावाला राज्य सरकारकडे मान्यता मिळवण्यासाठी पाठविण्यात आले आहे. या महामार्गाची लांबी १२२.६०० किमी असेल आणि यासाठी १०,९३१.३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर यामध्ये प्रवासाची वेळ सव्वातीन तासांवरून केवळ एका तासावर येईल, हे निश्चित करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गामुळे राज्यातील १० जिल्ह्यांना थेट जोडले जाईल, ज्यामुळे या जिल्ह्यांमध्ये जलद पोहोचता येईल. या महामार्गाच्या विस्तारामुळे जालना-नांदेड, नागपूर-चंद्रपूर, नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली यांसारख्या विविध ठिकाणी जोडणी करण्यात येत आहे. याशिवाय, देशातील सर्वात मोठे वाढवण बंदर समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी वाढवण-तवा आणि तवा-भरवीर या मार्गांवर द्रुतगती महामार्ग बांधण्यात येत आहे. जळगावपर्यंत समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याने जळगाव-छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्गाचा आकार १२२.६०० किमी असा निश्चित करण्यात आला आहे.





















