AI and Pune Culture: पुणेरी पाहुणचाराचा पेच ‘एआयला’ही सुटेना ! प्रसिद्ध संगणक तज्ज्ञांनी सांगितला स्वतःचा अनुभव…

पुणे शहरातील प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकरपुर यांनी आज एक अनोखा अनुभव शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच
पुणे शहरातील प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकरपुर यांनी आज एक अनोखा अनुभव शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय कितीही प्रगत झाला तरी पुणेरी संस्कारांच्या पुढे त्याची मजल जाणार नाही. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी पुणेरी पाहुणचाराचा पेच एआयला कसा समजत नाही याबद्दल एक किस्सा सांगितला. या किस्स्यामुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. डॉ. शिकरपुर यांनी पुणेरी संस्कार, पाहुणचार आणि ‘तुम्ही की आम्ही?’ या प्रश्नाची गंमत सांगताना चॅट जीपीटी आणि जेमिनी यांना काही प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत, असेही नमूद केले. यावेळी त्यांनी ‘गोष्ट आहे पृथ्वी मोलाची’ या दीप्ती चंद्रचूड यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गमतीजमती उलगडून सांगताना येणाऱ्या काळात याला पर्याय नाही, असेही स्पष्ट केले.
डॉ. शिकरपुर यांनी पुणेरी आणि सोलापुरी संस्कारांमधील फरक सांगताना एक साधा प्रश्न विचारला, ‘तुम्ही आम्हाला जेवायला बोलवणार की आम्ही तुम्हाला?’ हा प्रश्न एआयला विचारल्यावर चॅट जीपीटी आणि जेमिनीला याचे नेमके उत्तर देता आले नाही. अखेर त्यांना ‘तुम्हीच सांगा’ असे उत्तर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात मात्र अशा प्रश्नाचे उत्तर नेहमीच ‘तुम्ही’ असते, असे सांगून त्यांनी पुणेरी स्वभावाची खासियत उलगडली. यामुळे उपस्थितांमध्ये एक वेगळा आनंद झाला आणि त्यांना पुणेरी संस्कृतीची गोडी लागली.




















