New Bird Species Discovered: दोन नव्या प्रजातींची घरटी हिंगणघाटमध्ये

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील पाणपक्षी मिश्र विणवसाहतीत दोन नवीन प्रजातींची घरटी बांधली गेली आहेत. या प्रजाती म्हणजे मध्यम बगळा आणि मोठा बगळा. विदर्भातील सर्
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील पाणपक्षी मिश्र विणवसाहतीत दोन नवीन प्रजातींची घरटी बांधली गेली आहेत. या प्रजाती म्हणजे मध्यम बगळा आणि मोठा बगळा. विदर्भातील सर्वात मोठ्या पाणपक्षी वसाहतीत या प्रजातींचा समावेश झाल्याने पक्षी अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हिंगणघाट येथील या वसाहतीत दरवर्षी शेकडो पाणपक्षी प्रजननासाठी घरटी बांधतात. २०२५ मध्ये झालेल्या घरटी गणनेत एकूण १ हजार ७३ घरटी नोंदविण्यात आली होती. यावर्षी (२०२६) पहिल्या टप्प्यातील घरटी गणना पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील गणना सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. निसर्गसाथी ग्रुपतर्फे या विणवसाहतीचे नियमित निरीक्षण केले जाते. येथे छोटा बगळा, गाय बगळा, रात ढोकरी, छोटा पाणकावळा आणि भारतीय पाणकावळा या पाच प्रजाती दरवर्षी प्रजननासाठी घरटी बांधत होत्या. यावर्षी मध्यम बगळा आणि मोठा बगळा यांचा समावेश झाल्याने हिंगणघाटच्या जैवविविधतेत वाढ झाली आहे. प्रवीण कडू यांनी सांगितले की, या दोन्ही प्रजातींनी हिंगणघाटच्या विणवसाहतीची निवड केल्याने हा परिसर त्यांच्या दृष्टीने सुरक्षित व प्रजननासाठी अनुकूल आहे. यावर्षी मध्यम बगळा चे पिलं बाहेर आली असून, मोठा बगळा अंडी उबवत असल्याचे नोंदवले आहे. पक्षी अभ्यासकांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हिंगणघाटकरांसाठी हे अभिमानाचे कारण आहे. तसेच, पक्ष्यांच्या शांततापूर्ण व निकोप प्रजननासाठी वन विभागाने या परिसरात डी.जे., फटाके आणि ध्वनी प्रदूषणावर निर्बंध घालावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.





















