Oscar for Ramayana:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाने जगभरात मोठा प्रतिसाद मिळवला आहे. या चित्रपटावर दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी गेली १० वर्षे मेहनत घेतली आहे. त्याच्
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाने जगभरात मोठा प्रतिसाद मिळवला आहे. या चित्रपटावर दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी गेली १० वर्षे मेहनत घेतली आहे. त्याच्या अद्भुत ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामुळे संपूर्ण सिनेमा पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसत असून, यशने रावणाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या चित्रपटाची भव्यता, व्हीएफएक्स आणि संगीत हे सर्वच मंत्रमुग्ध करणारे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'रामायण'ला ऑस्कर मिळेल अशी त्यांना आशा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील 'प्राईम वन' या अत्याधुनिक स्टुडिओचे उद्घाटन केले. प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या फेज-१ सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. 'रामायण' हा चित्रपट याच स्टुडिओत तयार झाला आहे. याबद्दल बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, 'रामायण' हा महाग्रंथ याच मातीत रचला गेला आहे आणि हा चित्रपट इतिहासाचा एक सुवर्ण भाग ठरणार आहे. त्यांनी ट्रेलर पाहिल्यानंतर व्यक्त केलेल्या भावना स्पष्ट केल्या आणि सांगितले की, 'रामायण'ला ऑस्कर मिळाले नाही तर त्यांना खूप निराशा होईल. हा चित्रपट केवळ या दशकातील नाही, तर या सहस्रकातील सर्वोत्तम चित्रपट आहे.



















