Violent Family Dispute: विक्रोळीतील हत्येप्रकरणी नवी माहिती समोर आली

मुंबईच्या विक्रोळीतील राहुल नगर परिसरात एकाच कुटुंबातील तीन भावांमध्ये झालेल्या वादामुळे मोठा हाणामारीचा प्रकार उभा राहिला. या वादात सुनील विश्वकर्मा (४०) आणि त
मुंबईच्या विक्रोळीतील राहुल नगर परिसरात एकाच कुटुंबातील तीन भावांमध्ये झालेल्या वादामुळे मोठा हाणामारीचा प्रकार उभा राहिला. या वादात सुनील विश्वकर्मा (४०) आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला. सुनील यांचा सख्खा भाऊ सुरेंद्र याने हा हल्ला केला, ज्यामुळे या कुटुंबात एक भीषण घटना घडली. यामध्ये सुनील यांची पत्नी अंजू आणि लहान मुलगा विवान हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून, पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत सुरेंद्र आणि सूरज यांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीतील शिव छाया सोसायटीमध्ये सुनील, सुरेंद्र आणि सूरज हे तिघे भाऊ एकत्र राहत होते. बुधवारी रात्री १२.३० वाजता सुनील कामावरून घरी परतला असता, सुरेंद्रने मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यामुळे सुनील चिडला आणि त्याने सुरेंद्रला प्रश्न केला की, 'तू इतका मोठा आवाज का लावतोस?' या प्रश्नामुळे दोन्ही भावांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्यावर हाणामारी सुरू झाली. यावेळी सुरेंद्रची पत्नी प्रीती आणि भाऊ सूरज यांनी सुनीलच्या कुटुंबावर हल्ला केला. या तिघांनी सुनील यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.



















