Shocking Incident: आईच्या मृत्यूवेळी देखील आल्या नव्हत्या व्हिडिओ कॉल करणाऱ्या 'त्या' ३ मुली!

ज्यांनी आपल्याला जन्म दिला, लहानपणी मोठं केलं, त्या आई-वडिलांच्या अंतिम क्षणी उपस्थित न राहता फक्त व्हिडिओ कॉलवरून अंत्यसंस्कार पाहणाऱ्या तीन मुलींबद्दल एक धक्क
ज्यांनी आपल्याला जन्म दिला, लहानपणी मोठं केलं, त्या आई-वडिलांच्या अंतिम क्षणी उपस्थित न राहता फक्त व्हिडिओ कॉलवरून अंत्यसंस्कार पाहणाऱ्या तीन मुलींबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वृद्धाश्रमाने स्पष्ट केले की, वडिलांच्या निधनाच्या वेळी देखील या मुली उपस्थित नव्हत्या. शिवचरण रामरतन गुप्ता असे वडिलांचे नाव असून, ते सोनीपतच्या एका वृद्धाश्रमात निधन झाले. त्यांच्या आजारपणाची माहिती मुलींना देण्यात आली होती, तरीही त्या वडिलांना भेटायला आल्या नाहीत, ज्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिवचरण रामरतन गुप्ता हे मूळचे महाराष्ट्राचे होते आणि त्यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांना आणि पत्नी मीना गुप्ता यांना मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. नंतरच्या काळात नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी २०२४ मध्ये सोनीपतच्या 'अपना घर' वृद्धाश्रमात आश्रय घेतला. आश्रम संचालिका सारिका कालरा यांच्या मते, शिवचरण आपल्या तिन्ही मुलींवर खूप प्रेम करत होते. त्यांची एक मुलगी नेपाळमध्ये शिक्षिका आहे, दुसरी सुरतला आणि तिसरी एचडीएफसी बँकेत नोकरी करते. दिवसभरात ते मुलींशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधायचे आणि पुन्हा एकदा संसार उभा करण्याचे स्वप्न पाहायचे.



















