Crime Inspired by Series:दिल्लीतील महिलेला पतीने हत्येचा कट रचला

दिल्लीतील गगन विहार परिसरात घडलेल्या एका महिलेला पतीने केलेल्या हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे. ६२ वर्षीय सॉफ्टवेअर कन्सल्टंट कमल सिंहने एका
दिल्लीतील गगन विहार परिसरात घडलेल्या एका महिलेला पतीने केलेल्या हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे. ६२ वर्षीय सॉफ्टवेअर कन्सल्टंट कमल सिंहने एका क्राईम वेब सीरिजच्या कथेतून प्रेरणा घेत पत्नी कोमल सिंहच्या हत्येचा कट रचला. हत्येनंतर कमलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि १२ लाख ७५ हजार रुपयांची रोकड घेऊन नेपाळला पळून जाण्याचा विचार केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्याला चार दिवसांच्या आत मथुरेच्या रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. कमल आणि कोमल यांचे वैवाहिक जीवन गेल्या काही वर्षांपासून तणावपूर्ण होते. तपासात समजले की, कमलने मुंबईच्या एका प्रवासादरम्यान दुसऱ्या महिलेशी जवळीक साधली होती, ज्यामुळे तो पत्नीपासून वेगळा राहू लागला. कमलला जगतपुरी येथे एक प्रॉपर्टी खरेदी करायची होती, ज्याची नोंदणी त्याच्या वडिलांच्या नावावर व्हावी अशी त्याची इच्छा होती, तर कोमलला त्यात स्वतःचा हिस्सा हवा होता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. पोलिसांनी सांगितले की, कमलने जुलै महिन्यातच पत्नीच्या हत्येचा कट रचला होता आणि त्याने हरी नगर भागातून एक तलवार खरेदी करून ती घरात लपवून ठेवली होती.
कमल सिंहने पाहिलेल्या 'द स्टेअरकेस' या क्राईम सीरिजमधील कथानकाने त्याला हत्येचा कट रचण्यास प्रवृत्त केले. या सीरिजमध्ये पत्नीची हत्या होते, मात्र हत्येचं हत्यार कधीच पोलिसांना सापडत नाही. कमलनेही हत्येचं हत्यार गायब करण्याची योजना आखली होती, ज्यामुळे त्याच्यावर आरोप कमी होऊ शकतील. पोलिसांच्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी दुपारी घरात फक्त कमल आणि कोमल उपस्थित होते. मुलगा लायब्ररीत गेला होता, मुलगी ऑफिसमध्ये होती आणि मोलकरीणही काम संपवून निघून गेली होती. दुपारी १२:४५ च्या सुमारास, कमलने कोमलवर हल्ला केला. त्याने मागून तलवारीच्या साहाय्याने तिच्या डोक्यावर वार केला, आणि कोमल जीव वाचवण्यासाठी स्वयंपाकघरात पळाली. कमलने तिचे केस पकडून तिला बाहेर ओढले आणि कात्रीने तिच्यावर अनेक वार केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तिच्या शरीरावर १० हून अधिक गंभीर जखमा आढळल्या आहेत. संपूर्ण हत्याकांड अवघ्या १० मिनिटांत घडले.



















