CBI Investigation in Dowry Death Case: ठाण्यातील बहुचर्चित कथित हुंडाबळी प्रकरण आता CBI कडे

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ठाण्यातील काशिमीरा पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये दाखल झालेल्या एक अत्यंत संवेदनशील हुंडाबळी प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ठाण्यातील काशिमीरा पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये दाखल झालेल्या एक अत्यंत संवेदनशील हुंडाबळी प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात विशेष तपास पथकाने पती, सासू-सासरे, दोन नणंदा आणि दीर यांच्यासह सहा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक, विश्वासघात, सक्तीने गर्भपात घडविणे, मारहाण आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमांचा समावेश आहे. या प्रकरणात तक्रारदार अमर दिवाकर मिश्रा यांनी आपल्या २६ वर्षीय मुलीच्या विवाहाच्या संदर्भात गंभीर आरोप केले आहेत.
अमर मिश्रा यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुली अस्मिता हिचा विवाह २० नोव्हेंबर २०२१ रोजी अभय मनीष मिश्रा याच्याशी झाला. विवाहाच्या समारंभात अस्मिताला सुमारे १५.५१ लाख रुपये रोख आणि १७.३५ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने देण्यात आले होते. मात्र, विवाहानंतर अस्मिताने आपल्या वडिलांना सांगितले की, तिचा पती अभय हा सिव्हिल इंजिनीअर नाही आणि त्याच्याकडे कोणतीही नोकरी नाही. याशिवाय, पतीकडून वारंवार फ्लॅट त्याच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. विवाहानंतर मिळालेले दागिने सासू आणि नणंदांनी स्वतःकडे घेतले, तसेच अस्मिताचा पगारही पतीकडून रोख किंवा ऑनलाइन पद्धतीने घेतला जात होता. यामुळे अस्मिताला आर्थिक त्रास सहन करावा लागला, ज्यामुळे तिच्या वडिलांनी वारंवार तिच्या बँक खात्यात पैसे पाठवले.



















