Armed robbery in Wagholi:व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांची सोनसाखळी लूट

वाघोली : हवेली तालुक्यातील गावडेवाडी आणि शिरसवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करणाऱ्या सं
वाघोली : हवेली तालुक्यातील गावडेवाडी आणि शिरसवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करणाऱ्या संतोष ज्ञानोबा गावडे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात संतोष गावडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत आरोपींनी त्यांच्या गळ्यातील २२ तोळे वजनाच्या दोन सोनसाखळ्या लुटल्या, ज्यांची किंमत सुमारे ११ लाख रुपये आहे. संतोष गावडे हे ५० वर्षांचे असून, गावडेवाडी येथे राहतात. त्यांच्या व्यवसायाच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे काम करून रात्री घरी जात असताना या घटनेचा सामना करावा लागला.
संतोष गावडे यांचे कार्यालय वाडेबोल्हाई चौकात आहे. रात्रीच्या वेळी ते कार्यालय बंद करून आपल्या कारने घरी जात होते. त्यावेळी पंडित गावडे यांच्या बंगल्यासमोर एक व्यक्ती दुचाकी बंद पडल्याचा बहाणा करून त्यांच्या कारला अडवले. त्याचवेळी दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना घेरले. एका आरोपीने अचानक गोळीबार केला, ज्यामुळे गोळी कारच्या काचेला लागून संतोष गावडे यांच्या चेहऱ्यावर लागली. या गंभीर जखमेमुळे संतोष गावडे खाली कोसळले आणि त्याच क्षणी आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून घेतल्या आणि दुचाकीवरून पलायन केले.



















