Rishabh Pant to Leave Delhi:ऋषभ पंत दिल्ली सोडणार

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे एक भावनिक पोस्ट शेअर करत उत्तराखंडमध्ये स्थायिक होण्या
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे एक भावनिक पोस्ट शेअर करत उत्तराखंडमध्ये स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने या संदर्भात मदतीची विनंती केली असून, मुख्यमंत्री धामी यांनी तत्काळ प्रतिसाद देत त्याला मदतीचे आश्वासन दिले आहे. पंतने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तो बऱ्याच दिवसांपासून उत्तराखंडमध्ये चांगली जमीन शोधत आहे, परंतु त्याला ती मिळत नाही. त्याने आपल्या प्रेमाची आणि 'पहाडी लोकांसोबत' राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने स्पष्ट केले की, तीन वर्षांपासून तो जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण आजच्या काळात चांगली जमीन मिळवणे खूप कठीण झाले आहे. त्यामुळे त्याने मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी विनंती केली आहे. त्याने याबाबत मुख्यमंत्री धामी यांना संबोधित करत म्हटले की, 'माझ्या मातृभूमीवर घर बांधण्याची इच्छा आहे, कृपया या प्रकरणात मदत करा.'
मुख्यमंत्री धामी यांनी ऋषभ पंतच्या भावनिक पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्याला आश्वासन दिले की, त्याच्या या इच्छेला योग्य प्रतिसाद दिला जाईल. त्यांनी म्हटले की, 'प्रिय ऋषभ, तू उत्तराखंडचा अभिमान आहेस. तुझ्या मातृभूमीप्रति असलेले प्रेम आणि येथे परत येण्याची भावना अत्यंत कौतुकास्पद आहे.' धामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची ग्वाही दिली आहे, जे लवकरच ऋषभ पंतशी संपर्क साधून त्याला आवश्यक सहकार्य करतील. यामुळे पंतच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.





















