Fermented Garlic Health Benefits:आंबवलेला लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे

लसूण हा एक असा मसाला आहे जो आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच सापडतो. त्याची तिखट चव अनेकांना आवडत नाही, त्यामुळे कच्चा लसूण खाणे टाळले जाते. परंतु, लसूणच्या आरोग्यदाय
लसूण हा एक असा मसाला आहे जो आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच सापडतो. त्याची तिखट चव अनेकांना आवडत नाही, त्यामुळे कच्चा लसूण खाणे टाळले जाते. परंतु, लसूणच्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे तो अनेक आजारांवर प्रभावी ठरतो. आयुर्वेदानुसार, लसूण हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण खाणे उपयुक्त ठरते. लसूण खाल्ल्याने रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, आंबवलेला लसूण अधिक फायदेशीर ठरतो. आंबवलेल्या लसूणामुळे त्याची चव सौम्य होते आणि त्यातील जैव-सक्रिय घटक अधिक प्रभावीपणे कार्य करतात. त्यामुळे, आंबवलेला लसूण हृदयाच्या आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो.
डॉ. सलीम झैदी यांनी सांगितले की, आंबवलेला लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. आंबवलेला लसूण कच्च्या लसणाच्या तुलनेत अधिक प्रभावी असतो. त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म अधिक प्रमाणात असतात, जे शरीरातील विविध आजारांवर प्रभाव टाकतात. आंबवलेला लसूण तयार करण्याची प्रक्रिया सोपी आहे. यामध्ये लसूणाच्या पाकळ्या मिठाच्या पाण्यात साठवून ठेवल्या जातात, ज्यामुळे नैसर्गिक आंबवण्याची प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमुळे लसणाची चव गोड आणि सौम्य होते, तसेच त्याचा वासही कमी होतो. आंबवलेला लसूण तयार करण्यासाठी साधारणतः ३० ते ४५ दिवस लागतात. यामुळे त्याचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.





















