SUV Trend in India: देशात सर्वाधिक विकली जाणारी गाडी 'मारुती डिझायर'

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या एसयूव्ही गाड्यांचा प्रचंड ट्रेंड पाहायला मिळत आहे. ग्राहकांची आवड आणि मागणी यामुळे अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट आणि मिनी एसयूव्ही बाज
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या एसयूव्ही गाड्यांचा प्रचंड ट्रेंड पाहायला मिळत आहे. ग्राहकांची आवड आणि मागणी यामुळे अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट आणि मिनी एसयूव्ही बाजारात आणत आहेत. तथापि, या सर्व ट्रेंड्सच्या पार्श्वभूमीवर, देशात सर्वाधिक विकली जाणारी कार एक सेडान आहे, जी दुसरी तिसरी कोणतीही नाही, तर मारुती सुझुकीची डिझायर आहे. गेल्या आर्थिक वर्षात प्रवासी वाहनांच्या विक्रीत एसयूव्ही गाड्यांचा वाटा ५६.७ टक्के होता, तर सेडान गाड्यांचा वाटा फक्त ८.५ टक्के होता. यावरून स्पष्ट होते की, एसयूव्ही गाड्यांना किती मागणी आहे, तरीही मारुती डिझायरने विक्रीच्या बाबतीत सर्व एसयूव्ही गाड्यांना मागे टाकले आहे. आकर्षक डिझाइन, परवडणारी किंमत, उत्कृष्ट मायलेज आणि सुरक्षिततेच्या आधुनिक फीचर्समुळे ग्राहक अजूनही या गाडीला प्राधान्य देत आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीत मारुती डिझायरच्या ८९,८१६ युनिट्सची विक्री झाली आहे.
नवीन मारुती डिझायरमध्ये ६ एअरबॅग्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे या गाडीची सुरक्षा आणखी वाढली आहे. भारत एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये या कारला 'ॲडल्ट' आणि 'चाइल्ड' सेफ्टीमध्ये ५-स्टार रेटिंग मिळाले आहे, जे मारुतीसाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला आहे. या गाडीमध्ये १.२-लीटरचे Z12E पेट्रोल इंजिन आहे, जे पेट्रोल मॉडेलमध्ये ८१.५८ पीएस पॉवर आणि १११.७ एनएम टॉर्क देते. CNG आवृत्तीत, पॉवर ६९.७५ PS आणि टॉर्क १०१.८ Nm आहे. या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ६.२६ लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरियंटची किंमत ९.३६ लाखांपासून आहे.


















